भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारताची फलंदाजी सुरूच आहे. स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे.भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 400 धावा पार झाली आहे.
विराट कोहलीने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. विराटने आतापर्यंत आपल्या खेळीत पाच चौकार मारले आहेत. भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ पोहोचली आहे. विराट कोहलीने कसोटीतील 28 वे शतक ठोकले आहे. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे.