India vs Australia 4th Test : भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले आहे. चेतेश्वर पुजारा (42) आणि गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 248 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली.
दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा 180 आणि कॅमेरून ग्रीन 114 धावांवर बाद झाला. दोघांनी 5व्या विकेटसाठी 208 धावांची भागीदारी केली. टीम इंडियासाठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले.
अहमदाबाद कसोटी सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. सामना हरल्यास किंवा अनिर्णित राहिल्यास भारताला श्रीलंका-न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. ऑस्ट्रेलियाने आधीच अंतिम फेरी गाठली आहे.