भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले आणि अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. यासह सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांच्या क्लबमध्ये सामील झाला. भारतासाठी कसोटीत द्विशतक झळकावणारा तो पाचवा डावखुरा सलामीवीर ठरला. यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या 10व्या डावात द्विशतक झळकावले आणि करुण नायर-विनोदा कांबळी यांच्या क्लबमध्ये सामील झाला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने सहा गडी गमावून 336 धावा केल्या होत्या, त्यात यशस्वी जैस्वाल 179 धावांवर नाबाद असून रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद होते. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पुन्हा एकदा शानदार सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वाल द्विशतक झळकावण्यात यशस्वी ठरली. या सामन्याच्या पहिल्या डावात जैस्वालने 209 धावा केल्या. घरच्या भूमीवर त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय द्विशतक आहे. यासह हा युवा फलंदाज विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांच्या क्लबमध्ये सामील झाला.
भारतआणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ चमकदार कामगिरी करत आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांसारख्या बलाढय़ खेळाडूंशिवाय आलेल्या भारतीय संघाने इंग्लिश गोलंदाजांची दमछाक केली आहे. यात युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचे महत्त्वाचे योगदान होते.
200 धावा करणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या 22 वर्षे 37 दिवसात त्याने ही कामगिरी केली आहे. या यादीत विनोद कांबळी पहिल्या दोन क्रमांकावर आहे. तर सुनील गावस्कर 283 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाचवा कसोटी सामना खेळत असलेल्या जयस्वालने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या बॅटच्या गडगडाटाने विक्रमांची मालिका रचली. त्याने भारताची धावसंख्या 396 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या शानदार कामगिरीच्या जोरावर जैस्वाल २०० धावा करणारा पाचवा डावखुरा भारतीय फलंदाज ठरला.