भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर होणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.धवन वनडे मालिकेत कर्णधार आहे
ऑकलंडच्या ईडन पार्कवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामना सुरू आहे. भारताने 45.3 षटकात 4 गडी गमावून 253 धावा केल्या आहेत. सध्या श्रेयस अय्यर 68 धावांवर तर संजू सॅमसन ३६ धावांवर खेळत आहे.
पुढील विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही एकदिवसीय मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. असो, एकदिवसीय विश्वचषकाला एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक आहे. उमरान मलिक, संजू सॅमसन, शुभमन गिल, युझवेंद्र चहल या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत आपली छाप सोडण्याची सुवर्णसंधी आहे.
भारतीय संघाची धावसंख्या 44 षटकांत 4 बाद 240 धावा झाली आहे. संजू सॅमसन 33 आणि श्रेयस अय्यर 68 धावा करत खेळत आहे. श्रेयसने आपल्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार मारले आहेत. त्याचबरोबर संजू सॅमसनने चार चौकार मारले आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत 54 धावांची भागीदारी झाली आहे.