पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 190 धावा केल्या. रोहित शर्माने 64 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी दिनेश कार्तिक 19 चेंडूत 41 धावा करून नाबाद राहिला. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 122 धावाच करू शकला. वेस्ट इंडिजकडून शामराह ब्रूक्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 20 धावांची खेळी खेळली. अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी भारतासाठी घातक गोलंदाजी केली. तिघांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. या मालिकेतील पुढील सामना सोमवारी (1 ऑगस्ट) सेंट किट्समधील वॉर्नर पार्कवर खेळवला जाणार आहे.
भारताकडून अर्शदीप सिंग, आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 190 धावा केल्या.भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (64) अर्धशतक झळकावत विश्वविक्रमही केला.रोहित पुन्हा T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे.त्याचवेळी दिनेश कार्तिकने 19 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी केली.
कार्तिकने चार चौकार आणि दोन षटकार मारले.आर अश्विननेही नाबाद 13 धावा केल्या.रोहित आणि कार्तिकशिवाय सूर्यकुमार यादव (24), श्रेयस अय्यर (0), ऋषभ पंत (14), हार्दिक पांड्या (1), रवींद्र जडेजा (16) फार काही करू शकले नाहीत.