India vs West Indies (IND vs WI) 1st ODI: भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाच गडी राखून जिंकला आहे. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 114 धावा केल्या. भारताने पाच गडी गमावून लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारताने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव केला. रोहित शर्माने चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने अवघ्या 114 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने तीन आणि कुलदीप यादवने चार बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने इशान किशनच्या 52 धावांच्या जोरावर पाच विकेट्सवर 118 धावा केल्या आणि सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने दोन, जेडेन सेल्स आणि यानिकने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारतीय संघाने या सामन्यात चेंडूवर चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला छोट्या धावसंख्येवर रोखले. मात्र, यानंतर टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेच प्रयोग केले. रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीला येण्याच्या मूडमध्ये नव्हते. ईशान आणि गिलने डावाची सुरुवात केली. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आला. हार्दिक चौथ्या क्रमांकावर तर जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे. शार्दुलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, भारताच्या पाच गडी बाद झाल्याने कर्णधार रोहितला फलंदाजीला उतरून सामना संपवावा लागला
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ 114 धावांवर गारद झाला. कुलदीप यादवने जेडेन सेल्सला बाद करून वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. सेल्सने तीन चेंडूंचा सामना केला पण त्याला खातेही उघडता आले नाही. कुलदीपच्या चेंडूवर हार्दिक पांड्याने त्याचा झेल टिपला.
कसोटीनंतर एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजचा संघ भारतासोबत स्पर्धा करण्यात अपयशी ठरला आहे. या डावात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने लय दाखवली नाही आणि कोणीही क्रिझमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न केला नाही. कर्णधार होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्यांच्याशिवाय केवळ अथंजे 22, किंग 17 आणि हेटमायर 11 यांना दुहेरी आकडा पार करता आला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेत वेस्ट इंडिजच्या शेपटीच्या फलंदाजांना सहज बाद केले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.