Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs WI: रोहित शर्मा फिटनेस चाचणी उत्तीर्ण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार

IND vs WI: रोहित शर्मा फिटनेस चाचणी उत्तीर्ण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार
, शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (12:27 IST)
टीम इंडियाचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्माने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये घेण्यात आलेल्या फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाले आहे. आता ते वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या T20 संघाचा नियमित कर्णधार झाल्यानंतर, रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नेतृत्व केले आणि टीम इंडियाला 3-0 ने विजय मिळवून दिला. यानंतर त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधारही बनवण्यात आले. मात्र, एकदिवसीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहितला दुखापत झाली आणि ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळले नाही.
 
रोहितच्या हाताला दुखापत झाली होती. यातून सावरण्यासाठी त्यांना सुमारे सात आठवडे लागले. यादरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. या दोन्ही मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका 1-2 अशा फरकाने आणि एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. 
 
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रोहितने त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे आणि 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ते  भारतीय संघाचे नेतृत्व करणार. या मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच निवड होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील खराब कामगिरीनंतर अनेक खेळाडूंना वनडे संघातून वगळले जाऊ शकते.
 
भारत वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. त्याचवेळी 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवले जातील. 
 
वेस्ट इंडिजचा भारत दौरा
6 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ODI)
9 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ODI)
11 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ODI)
16 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (T20)
18 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (T20)
20 फेब्रुवारी, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (T20)
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ते जिन्नाचे उपासक, आम्ही सरदार पटेलांचे, मुख्यमंत्री योगींचा सपावर हल्ला