पुढील महिन्यापासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासाठी आपला 18 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. रोहित शर्मा तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचे नेतृत्व करेल तर केएल राहुल उपकर्णधार असेल. बीसीसीआयने संघातील सर्व खेळाडूंना सोमवारी अहमदाबादमध्ये एकत्र येण्यास सांगितले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सराव पुन्हा सुरू करण्यापूर्वी तीन दिवस क्वारंटाईनमध्ये असेल. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळवले जातील. ही मालिका भारतीय संघाची वर्षातील पहिली घरची मालिका असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाला येथे विजयी मार्गावर परतायचे आहे.
भारतीय पथकाला 1 फेब्रुवारीला अहमदाबादला पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. येथे त्यांना तीन दिवस क्वारंटाईन तसेच सतत कोविड चाचणी घेतली जाईल. यानंतर ते 4 फेब्रुवारीला सराव सत्रात भाग घेतील आणि त्यानंतर 6 फेब्रुवारीला दोन्ही संघांमध्ये पहिला सामना खेळवला जाईल.
भारतीय एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल , कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
भारतीय टी20 संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.