हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये सोमवारी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमांचक झाला.सिकंदर रझा याच्या उत्कृष्ट शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेचा संघ विजयाच्या जवळपास पोहोचला होता, पण अखेरीस भारतीय गोलंदाजांनी दडपणाखाली स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि सामना 13 धावांनी जिंकला.तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला.झिम्बाब्वेचा सफाया केल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलच्या खोलीत जल्लोष साजरा केला.
भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू तिसऱ्या वनडेत झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर नाचून आनंद साजरा करत आहेत.गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेला धवन काळा चष्मा घालून टीमसोबत नाचताना दिसत आहे.त्याच्यासोबत टीमचे बाकीचे खेळाडूही 'काला चष्मा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (130) यांनी 8 बाद 289 धावा केल्या आणि त्यानंतर सिकंदर रझा (115) याच्या शतकानंतरही झिम्बाब्वेचा संघ तीन चेंडू शिल्लक असताना 276 धावांत गुंडाळला.गिलने वनडेतील पहिले शतक झळकावले.त्याने 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकला.गिलने तीन सामन्यांत 122.50 च्या सरासरीने 245 धावा केल्या आणि त्यासाठी त्याला सामनावीर तसेच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.