Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs ZIM:झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवून भारताने पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाला मागे टाकले

IND VS ZIM
, मंगळवार, 9 जुलै 2024 (08:05 IST)
भारतीय संघाने रविवारी हरारे येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला. फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे पहिल्या सामन्यातील पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्यात टीम इंडियाला यश आले, त्यामुळे पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. . हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 234 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 18.4 षटकांत सर्वबाद 134 धावांवर आटोपला. 

झिम्बाब्वेविरुद्ध मोठी धावसंख्या करून भारताने ऑस्ट्रेलियाला मागे सोडले होते. खरे तर या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरुद्ध दोन गडी गमावून 229 धावा केल्या होत्या. 

झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सलामीवीर अभिषेक शर्माने दुसऱ्या टी-20मध्ये दमदार फलंदाजी केली. अभिषेकने 47 चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. भारतासाठी अभिषेकचे हे पहिले शतक आहे.अभिषेक झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे, तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी डावात शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.  
 
अशा प्रकारे भारताने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकत एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. T20 मध्ये सर्वाधिक वेळा 100 किंवा त्याहून अधिक फरकाने जिंकणारा भारत देश बनला आहे. भारताने हे पाच वेळा केले आहे, तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी चार वेळा T20 मध्ये 100 पेक्षा जास्त फरकाने विजय मिळवला आहे. याशिवाय इंग्लंड आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रान्स निवडणुकीत डाव्यांनी उजव्या आणि अति-उजव्यांना कसा दिला धोबीपछाड?