पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 4-1 अशी जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने दुसरा (100 धावा), तिसरा (23 धावा) आणि चौथा (10 विकेट) टी-20 सामना जिंकला होता. तर पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने 13 धावांनी विजय मिळवला होता.
हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे रविवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 18.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 125 धावा करता आल्या. भारताने हा सामना 42 धावांनी जिंकला. या सामन्यात शिवम दुबेला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने 26 धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. त्याने एकूण 28 धावा केल्या आणि आठ विकेट घेतल्या.
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. मुकेश कुमारने संघाला पहिला धक्का दिला. एका धावेवर त्याने माधवरेला बोल्ड केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मुकेशने ब्रायन बेनेटवर निशाणा साधला आणि त्याला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या.
मारुमणी आणि मायर्स यांच्यात44 धावांची भागीदारी झाली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 44धावांची भागीदारी झाली जी नवव्या षटकात सुंदरने मोडली. त्याने मारुमणीला एलबीडब्ल्यू आऊट केले. तो 27 धावा करून बाद झाला तर मायर्स 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात सिकंदर रझाने आठ, कॅम्पबेलने चार धावा, मदंडेने एक धाव, मावुताने चार धावा केल्या.
भारताविरुद्ध या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या फराज अक्रमने चमकदार कामगिरी केली. त्याने प्रथम आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
भारताकडून मुकेश कुमारने एकूण चार विकेट घेतल्या . त्याने माधवरे, बेनेट, अक्रम आणि नगारावा यांना बाद केले. याशिवाय शिवम दुबेने 2 तर तुषार, सुंदर आणि अभिषेकने प्रत्येकी एक विकेट घेतली.