Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

India Legends vs South Africa Legends : इंडिया लिजेंड्स ने पहिला सामना जिंकला, आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला

India Legends vs South Africa Legends :  इंडिया लिजेंड्स ने पहिला सामना जिंकला, आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला
, शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (23:20 IST)
इंडिया लिजेंड्स ने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सचा 50 धावांनी पराभव केला.प्रथम फलंदाजी करताना स्टुअर्ट बिन्नीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 217 धावा केल्या.प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 156 धावाच करू शकला.
 
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इंडिया लिजेंड्सने चांगली सुरुवात केली.सचिन तेंडुलकर आणि नमन ओझा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी झाली होती.यानंतर सचिन तेंडुलकर 15 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.पुढच्याच षटकात नमनही २१ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.सुरेश रैनाने 22 चेंडूत 33 धावांची दमदार खेळी केली.युवराजने 8 चेंडूत 6 धावा केल्या.युसूफ पठाणने 12 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले.भारताने शेवटच्या पाच षटकात 80 पेक्षा जास्त धावा केल्या. 
 
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत, जे 4 शहरांमध्ये एकूण 23 सामने खेळणार आहेत.सहभागी संघांमध्ये इंडिया लिजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स आणि न्यूझीलंड लीजेंड्स यांचा समावेश आहे.लोकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदे सरकारला भरावे लागणार 12 हजार कोटी, जाणून घ्या NGT ने का दिला असा निर्णय