Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

India vs Sri Lanka 1st ODI :विराट कोहलीची श्रीलंके विरुद्ध झंझावात खेळी, 45 वे शतक झळकावले

India vs Sri Lanka 1st ODI :विराट कोहलीची श्रीलंके विरुद्ध झंझावात खेळी, 45 वे शतक झळकावले
, मंगळवार, 10 जानेवारी 2023 (17:19 IST)
भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच श्रीलंकेचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव केला.
 
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी 2023 वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट कोहलीने शतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक आहे, तर हे 73 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. 
 
विराट कोहलीने हे शतक 80 चेंडूत पूर्ण केले आणि शेवटच्या षटकापर्यंत तो क्रीजवर राहिला 
 
विराट कोहलीने आपल्या डावात एकूण 113 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 87 चेंडू खेळले. विराट कोहलीने त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार मारला . णि सुमारे 130 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. विशेष म्हणजे विराटने शेवटच्या डावातही तेवढ्याच धावा केल्या. 
 
विराट कोहलीचे वनडेतील हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी १० डिसेंबरला विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध ११३ धावांची खेळी केली होती .या सामन्यात इशान किशनने द्विशतक झळकावले होते. म्हणजेच एका महिन्याच्या आत विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली. टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी तयारी करत आहे आणि त्या दृष्टीने विराट कोहलीचे फॉर्ममध्ये येणे हे एक चांगले चिन्ह आहे. 
 
विराट कोहलीने या खेळीने अनेक विक्रम केले आहेत. विराट कोहलीचे हे श्रीलंकेविरुद्धचे 9वे एकदिवसीय शतक आहे,  घरच्या मैदानावरील हे त्याचे 20वे शतक आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या 20 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बाईक टॅक्सी'च्या परवानगी बाबतच्या अनिश्चिततेबद्दल मुंबई उच्च न्यायालय कडून राज्य सरकारला फटकार