Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL Auction 2022 : इशान किशन बनला या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू

IPL Auction 2022 : इशान किशन बनला या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू
, शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (16:52 IST)
IPL 2022 च्या लिलावात विकला जाणारा इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने या खेळाडूवर 15.25 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. याआधी आजच्या लिलावात श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले. त्यानंतर हर्षल पटेल 10 कोटी 75 लाख रुपयांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये परतला आहे. तर पंजाब किंग्जने शिखर धवनला 8 कोटी 25 लाख रुपयांना, राजस्थान रॉयल्सने रविचंद्रन अश्विनला 5 कोटी रुपयांना आणि पॅट कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने 7.25 कोटी रुपयांना खरेदी केले. लिलावादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि कृणाल पंड्या यांच्यावर देखील धनवर्षाव झाला आहे. दोन्ही खेळाडूंना 8 कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सने इशान किशनला 15.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होते. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सची ही सर्वाधिक बोली आहे. यापूर्वी 2011 मध्ये त्याने रोहित शर्माला 9.25 कोटींना खरेदी केले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्योगपती राहुल बजाज यांचे कर्करोगाने निधन