आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत, तेराव्या हंगामाचा अंतिम सामना आणि सामन्यांच्या वेळाबद्दल निर्णय घेण्यात आला. 29 मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून 24 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात अंतिम सामनच्या मान मुंबईला मिळाला आहे. 2019 साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर मात करत विजेतेपद पटकावले होते.
आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्या मुंबई इंडियन्सकडे पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. आयपीएलच्या गत हंगामातील आकडेवारीवर विश्वास ठेवला तर रोहित शर्मा पुन्हा एकदा आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊ शकतो. 2009 साली रोहितने डेक्कन चार्जर्स आणि 2015 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही सामने 24 मे रोजीच खेळवण्यात आले होते. मुंबई इंडियन्सने आतार्पंत 2013, 2015, 2017 आणि 2019 या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.
जखमी खेळाडूऐवजी मिळेल दुसर्याला संधी
आयपीएलच तेराव्या हंगामासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत झाली तर तो मैदानाबाहेर जाऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात दुसर्या खेळाडूला संधी मिळू शकते.
आयपीएलच्य आगामी हंगामासाठीही हा नियम लागू करण्यात येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांनी याबद्दल माहिती दिली. दरम्यान, याचसोबत सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नसून, रात्री 8 वाजता सामने खेळवले जाणार आहेत. काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे, अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्काबोर्तब झाले आहे. याचसोबत यंदाच्या हंगामात डबल हेडर सामन्यांची संख्याही कमी करण्यात आली असून यंदा केवळ 5 डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत.