न्यूझीलंडविरुध्दच्या दुसर्या टी20 सामन्यात क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडूंची कामगिरी उजवी ठरली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात दोन झेल घेत रोहित शर्माला मागे टाकले आहे. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर विराटने मार्टीन गुप्टीलचा सुरेख झेल पकडत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणार्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकाविले.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणार्या भारतीय खेळाडूंमध्ये आता प्रथम स्थानी सुरेश रैना (42), दुसर्या स्थानी विराट कोहली (41) तर रोहित शर्मा (40 झेल) तिसर्या स्थानी आहे. दरम्यान, रैनाला मागे टाकण्यासाठी विराटला आणखी दोन झेल घेण्याची गरज आहे.