पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने सांगितले की, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने
भारतीय संघाचे अनुकरण करायला हवे. यासोबतच पाकिस्तानी संघाला कर्णधार विराट कोहली यच्याकडून शिकायला हवे. अख्तर याने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर हे विधान केले आहे.
शोएब अख्तर म्हणाला, मी भारतीय क्रिकेट संघाची प्रगती पाहिली आहे. पाकिस्तान आपल्या आक्रमक क्रिकेटमुळे ओळखला जातो. आम्ही कधीही भेदरट नव्हतो. आम्ही आक्रमक होतो आणि लढा द्यायचो.'
अख्तर पुढे म्हणतो, 'आमच्या कर्णधाराची तुलना भारतीय कर्णधाराशी करा. अजहर अली (कर्णधार) आणि
मिसाबाह उल हक (प्रशिक्षक) यांनी असे प्रयत्न करायला हवेत, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ चांगला तयारीचा होईल. रोडमॅप असायला हवा की आपल्याला विराट कोहलीच्या संघापेक्षा कसे चांगले खेळायचे आहे.'
पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांनी टीम चांगली बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, असेही अख्तर म्हणाला. त्याने कोहलीच्या फिटनेसचेही कौतुक केले आहे. 'कोहली फिटनेसवेडा आहे आणि त्याची टीम त्याला फॉलो करते. जर कर्णधारच असा असेल, तर त्याची टीमही तशीच दमदार असणार,' असे शोएब म्हणतो.