श्रीलंकेचा संघ पाकिस्तानात खेळायला आल्यावर सर्व व्यवस्थित पार पडत असल्याचा दावा केला जात आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्याध्यक्ष एहसान मानी यांना पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचं जाणवत आहे.
उल्लेखनीय आहे की 2009 मध्ये पाकिस्तानात याच श्रीलंका संघावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही. पण आता मानी यांच्याप्रमाणे पाकिस्तान अधिक सुरक्षित आाहे आणि ऐवढेच नव्हे तर पाकिस्तानपेक्षा भारतात अधिक धोका आहे.
श्रीलंकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पाकिस्तानातील सुरक्षेबाबत कुणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. पाकिस्तानातील कसोटी क्रिकेटचे हे पुनरुज्जीवनच आहे. पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे हे आम्ही दाखवले असून सध्या तर भारतातच अधिक धोका आहे, असे मानी म्हणाले.