हिवाळ्यात पेट्‌सना जपा

शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (14:30 IST)
हिवाळ्याचे चार महिने आपण कुडकुडत असतो. या दिवसात आपण स्वेटर, गरम कपडे घालतो. गरम पाण्याने आंघोळ करतो. पण मुक्या प्राण्यांचं काय? आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची काळजी आपणच घ्यायला हवी. थंडीत प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या काही टिप्स...
 
सगळ्या प्राण्यांना थंडी वाजते. कुत्रा, मांजर, पक्षी, ससा सगळे प्राणी कुडकुडत असतात. त्यामुळे या दिवसात पाळीव प्राण्याला घराबाहेर ठेवू नका. खूप थंडी असेल तर त्यांना खोलीतच ठेवा. या प्राण्यांनाही सर्दी होते. थंडीत भटके प्राणी गाड्यांखाली झोपतात. त्यामुळे गाडी काढण्याआधी खाली कोणी झोपलं नाही ना, याची खात्री करून घ्या.
 
थंडीत स्वेटर घातल्याशिवाय चैनही पडत नाही. तुमच्याप्रमाणेच तुमच्या प्राण्यांनाही गरम कपडे घाला. त्यांच्यासाठी छानसा स्वेटर शिवून घ्या. पायात मोजे घाला. घरात हिटर असेल तर प्राण्यांनाही ऊब मिळेल असं बघा.
 
तुम्ही घरात पक्षी पाळला असेल तर त्यांनाही ऊब मिळू द्या. त्यांच्या पिंजर्‍यावर एखादी चादर टाका. पक्ष्यांना काही काळ शेकोटीजवळ ठेवा.
 
कुत्रा, मांजर, ससा या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. या केसांमुळे या प्राण्यांचा थंडीपासून बचाव होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात या प्राण्यांचे केस कापू नका.
अमृता पाटील

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख वेदनांपासून मुक्ती मिळेल या तेलामुळे, जाणून घ्या तयार करण्याची सोपी विधी