Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

देवपूजेची भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
, शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (17:43 IST)
चांदीची आणि तांब्याची पूजेची भांडी घरात सगळ्यांकडेच असतात. आता ही भांडी धुणे म्हणजे तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते कारण इतर भांड्यांप्रमाणे तुम्हाला ही भांडी घासता येत नाहीत. तुम्हाला पूजेची ही भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर हे तुम्ही नक्कीच वाचायला हवे.
 
सर्वसाधारण सगळ्याच घरांमध्ये तांब्याची पूजेची भांडी असतात. कलश, फुलपात्र, ताम्हण, पळी, समई अशी भांडी सगळ्यांकडे असतात. इतरवेळी काळी पडणारी तांब्याची भांडी धुतल्यानंतर छान चकचकीत दिसतात. घरच्या घरी तांब्याची भांडी धुण्याची जाणून घ्या सोपी पद्धत.
 
कोकम आणि मीठ-
कोकणाकडील प्रत्येकाच्या घरात ओले कोकम हे असतातच. दोन ते तीन कोकमच्या पाकळ्या घेऊन त्यात मीठ घालून तुम्ही तांब्याची भांडी घासली की, ती छान चकचकीत होतात.
 
चिंच- आंबट चिंचेचा गोळा तर हमखास आपल्या घरात असतोच. तुम्ही चिंचेचा वापर करूनही ही भांडी स्वच्छ करू शकता. चिंच आणि मीठ घेऊन तुम्ही तुमची तांब्याची भांडी हमखास धुवू शकता.
 
रेडिमेड पावडर- हल्ली बाजारात तांब्याची भांडी धुण्यासाठी रेडिमेड पावडर मिळते. ती वापरुन तुमची तांब्याची भांडी धुवू शकता. ही पावडर वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा साफ करणारी पावडर जर चरचरीत असेल तर त्याचा वापर करु नका. कारण त्यामुळे तुमच्या तांब्याच्या भांड्यांना चरे पडतील. अनेकांच्या घरी पूजेची चांदीची भांडीदेखील असतात. चांदीची भांडी दिसायला फारच सुंदर असतात. पण ही भांडी धुणे डोक्याला ताप होऊन जाते. कारण जर चांदीची भांडी उघडी राहिली तर ती अनेकदा काळी पडतात. मग कायम ही भांडी पुन्हा लख्ख करायची कशी असा प्रश्न पडतो.
 
कोलगेट पावडर- तुम्ही कोणत्याही सोनाराकडे गेलात तरी देखील ते याच पद्धतीचा अवलंब करुन कोलगेट पावडरचा वापर करतात. हल्ली बाजारात फारच कमी ठिकाणी ही कोलगेट पावडर मिळते. कोलगेट पावडर कोरडीच भांड्यावर वापरा. तुम्हाला तुमची भांडी स्वच्छ झालेली दिसतील. 
 
बेकिंग सोडा- साधारण एक लीटरभर पाणी घेऊन त्यात साधारण एक मोठा चमचा बेकिंग सोडा घाला.  त्यात अ‍ॅल्युमिनिअम फॉईलचा गोळा घालून पाणी उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यात 10 सेकंद ठेवा आणि चांदीची भांडी काढून लख्ख करुन घ्या. 
 
प्यायच्या सोडामध्ये लिंबू पिळून त्यात साधारण तासभर तरी तुमची चांदीची भांडी ठेवून द्या. तुम्हाला
तुमच्या चांदीच्या भांडीवरचा मळ, काळपट निघून गेलेला दिसेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुलकंदाचे आरोग्य लाभ जाणून घ्या