Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गावस्कर-सचिन यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट

गावस्कर-सचिन यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट
मुंबई , बुधवार, 25 डिसेंबर 2019 (13:42 IST)
लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर या दोन महान क्रिकेटपटूंनी वांद्रे-कलानगर येथे मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. ही निव्वळ सदिच्छा भेट होती, असे सांगणत येत असले तरी सचिनच्या सुरक्षेचा मुद्दा हे या भेटीचे कारण होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
ठाकरे कुटुंबाचे क्रिकेटप्रेम सर्वांनाच ठावूक आहे. जसे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी ठाकरे कुटुंबाचे घरोब्‍याचे संबंध आहेत. तसेच क्रिकेट जगतातील दिग्गजांनाही ठाकरे कुटुंबाचे आकर्षण राहिलेले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनच हे नाते दृढ झालेले आहे. त्यातही सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या मुंबईकर दिग्गज क्रिकेटपटूंवर 'मातोश्री'ने नेहमीच कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. याच जिव्हाळ्यातून या दोन दिग्गज क्रिकेटपटूंची पावले मंगळवारी 'मातोश्री'कडे वळली.
 
सचिन व सुनील गावस्कर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मातोश्री निवासस्थानी पोहोचले. दोघांनीही उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सुमारे अर्धा तास हे दोघे मातोश्री निवासस्थानी होते.
यादरम्यान मनमोकळ्या गप्पा रंगल्या. उध्दव यांचे पुत्र व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
 
दरमन, उध्दव यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर उध्दव यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे.
शरद पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र
येत महाविकास आघाडी स्थापन केली व या आघाडीचे सरकार राज्यात विराजमान झाले. या ऐतिहासिक अशा आघाडीबाबत संपूर्ण देशात उत्सुकता असून तीन पक्षांच्या सरकारचा कारभार हाकण्याचे आव्हान उध्दव
यांनी स्वीकारले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहा हजार कोटींच्या अटल जल योजनेला मंजुरी