Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

झहीर - सागरिका कोर्ट मॅरेज करणार

झहीर - सागरिका कोर्ट मॅरेज करणार
, शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (09:23 IST)
भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान याच महिन्यात सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या दोघांच्याही घरच्यांनी लग्नासाठी संमती दिलीये आणि दोघंही कोर्ट मॅरेज करणार आहे. झहीर आणि सागरिका यांनी आयपीएलच्या १०व्या हंगामादरम्यान साखरपुडा केला होता. दोघांनी ट्विटरवरुन साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईत ग्रँड पार्टीही रंगली होती. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. झहीर मुस्लिम तर सागरिका हिंदू असल्याने दोघांनी कायदेशीररित्या एकत्र येत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतलाय. 

दरम्यान, सागरिका आणि झहीरच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी २७ नोव्हेंबरला रिसेप्शन आहे. खुद्द झहीरने ही बातमी दिलीये. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिर्डी : साई दर्शनासाठी पुष्पगुच्छ नेता येणार नाही