Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs ENG ODI : T20 नंतर भारत एकदिवसीय मालिका जिंकेल सामने कधी कसे पाहायचे जाणून घ्या

IND vs ENG ODI : T20 नंतर भारत एकदिवसीय मालिका जिंकेल सामने कधी कसे पाहायचे जाणून घ्या
, मंगळवार, 12 जुलै 2022 (16:08 IST)
India vs England (IND vs ENG) 1st ODI  :टी-20 मालिका संपल्यानंतर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली होती आणि आता एकदिवसीय मालिकेतही ही गती कायम ठेवायची आहे. त्याचबरोबर जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे इंग्लंड संघ अधिक मजबूत झाला आहे.
 
वनडेत इंग्लंडचा नियमित कर्णधार म्हणून जॉस बटलरची ही पहिलीच मालिका असेल. या मालिकेद्वारे दोन्ही संघ पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीतही सहभागी होतील. भारत पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे, तर इंग्लंड वनडेचा गतविजेता आहे.
 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवार 12 जुलै रोजी होणार आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता नाणेफेक होईल आणि पहिला चेंडू 5.30 वाजता टाकला जाईल.भारत-इंग्लंड मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे हा सामना सोनी स्पोर्ट्स वाहिनीवरही प्रसारित होणार आहे. सोनी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता.
 
दोन्ही संघ-
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, ब्रायडन कारर्स, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किन्सन, जो रूट, जेसन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली.
 
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टीचा,इशारा