Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टीचा,इशारा

heavy rain
, मंगळवार, 12 जुलै 2022 (15:05 IST)
बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्यासह मध्य भारतात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टीचा, तर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, १२ जुलै रोजी पूर्व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे
मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (मागील २४ तासांत) मुंबईत मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर दुपारी १२ ते १ दरम्यान कायम राहणार आहे. पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत :सलग दुसऱया आठवडय़ात पाच हजारांवर सक्रिय रुग्णांची संख्या कमी, अशी बोलते आकडेवारी