rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीला अटक, कारण जाणून घ्या

cricketer news
आपल्या पती आणि भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर गैरवर्तनाचा आरोप लावून मागील वर्षी चर्चेत आलेली हसीन जहां पुन्हा एकदा वादात अडकली आहे. तिला रविवारी रात्री अमरोहा पोलिसांनी मारहाण करण्याचा प्रकरणात अटक केली आहे.
 
क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी आपल्या सासरी गेली होती जिथे पोलिसांनी तिला अटक केली. अता ती जिल्हा हॉस्पिटलच्या प्रायव्हेट वार्डमध्ये आहे.
 
उल्लेखनीय आहे की शमीची पत्नी हसीन जहां रविवारी अचानक आपल्या सासरी सहसपुर अलीनगर पोहचली होती. मुलगी बेबो आणि तिची आयासोबत ती घरात दाखल झाली. यामुळे घरात वाद निर्माण झाला. हसीन घरात दाखल झाल्यामुळे शमीच्या आईने तिच्या विरोधात तक्रार केली. आईने म्हटले की हसीन जबरदस्तीने घरात शिरली आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील झोपडीधारकांना हक्काचे घर देणार : राहुल