23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर इतिहास रचला. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसह भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर आपला ध्वज फडकवला आहे. अमेरिका, चीन आणि सोव्हिएत रशियानंतर चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. त्याचबरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक भारतीयाने हा क्षण साजरा केला. त्याचवेळी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही हा क्षण साजरा करताना दिसला. धोनीचा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एमएस धोनी निळ्या टँक टॉप आणि जिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे आणि तो चंद्रयान -3 चे लँडिंग त्याच्या मस्त शैलीत साजरा करताना दिसत आहे. एमएस धोनी त्याच्या थाईने टाळ्या वाजवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी धोनीची पत्नी साक्षीने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची मुलगी झिवा चांद्रयान-3 च्या लँडिंगचा आनंद साजरा करताना दिसत आहे.