Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

MS Dhoni Fan: एम एस धोनीला चाहत्याने लिहिले रक्ताने निमंत्रण पत्र

dhoni
, सोमवार, 26 जून 2023 (14:34 IST)
एम एस धोनीचे जगात लाखो चाहते आहे. माहीची झलक पाण्यासाठी फॅन्स काहीही करतात. राजस्थानच्या भिलवड्यातील विजेशी कुमार नावाच्या धोनीच्या फॅन ने धोनीला आपल्या रक्ताने लिहिलेले निमंत्रण पाठविले आहे.  भिलवाडा जिल्ह्यातील शाहपुरा येथील क्रिकेटर विजेश कुमारचे प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग सोनी यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. विजेशने शाहपुरा येथे क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसानिमित्त 07 जुलैपासून हॅपी बर्थडे वर्ल्ड कप आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन महंत रामदासजी त्यागी महाराज यांच्या हस्ते रविवारी सकाळी खन्याच्या बालाजी मंदिर परिसरात करण्यात आले. धोनीचा चाहता विजेश याने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीला स्वत:च्या रक्ताने येथील निमंत्रण पत्रावर 'आय लव्ह यू माही', 'आपको आना है' असे लिहून शाहपुरात येण्याचे आमंत्रण पाठवले आहे. पत्राच्या मागील बाजूस विजेने रक्ताने आणखीनच सुंदर संदेश लिहून आपले प्रेम व्यक्त केले आहे.
 
पाच ठिकाणी आयोजित स्पर्धेत पाच सामने होणार असल्याचे विजेशने सांगितले. यामध्ये 12 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी १ जुलैपर्यंत नोंदणी केली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 31,000 रुपये आणि उपविजेत्या संघाला 16,000 रुपये रोख बक्षीस दिले जाईल. देशातील प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे. त्याचा प्रचार शहरात सर्वत्र होत आहे. क्रिकेटपटू विजेश हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तो आपल्या मेहनतीतून हा कार्यक्रम साकारणार आहे. याबाबत शाहपुरातील क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह दिसून येत आहे
 
या बाबतीत विचारल्यावर विजेश म्हणतो. मी धोनीचा खूप मोठा फॅन आहे. धोनीला लहानपणापासून क्रिकेट खेळताना पाहून मी क्रिकेटर झालो. त्यांनी देशासाठी जे काही केले आहे ते कौतुक करण्यासारखे आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही हटके आणि खास करण्याचा विचार करून हे करत आहे. त्यासाठी मी पैसे वाचवून स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत एकूण पाच ठिकाणी सामने होणार आहे. एकूण 12 संघ या स्पर्धेत सहभागी होणार. स्पर्धेसाठी नोंदणी 1 जुलै पर्यंत केली जाणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Accident: टेक्सास विमानतळावर विमानाच्या इंजिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू