Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात Corona चं सर्वात मोठं थैमान

पाकिस्तानच्या  क्रिकेट विश्वात Corona चं सर्वात मोठं थैमान
, बुधवार, 24 जून 2020 (15:31 IST)
क्रिकेट विश्वात Coronavirus घुसल्याची सर्वात खळबळजनक बातमी पाकिस्तानातून आली आहे. इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू असतानाच पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना COVID-19चा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. त्याला 24 तास उलटण्याच्या आत संघातल्या इतर 7 खेळाडूंनाही कोरोनाची लागण (pakistani players covid-19 positive)झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातले 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 28 जूनला पाकिस्तानचा क्रिकेट संघ कसोटी आणि T20सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यापूर्वीच या कोरोना हाहाकाराची बातमी आली आहे.
 
संघातल्या 10 जणांना कोरोनाची लागण झालेली pakistani players covid-19 positive) असली, तरी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पाकिस्तानचा संघ इंग्लंडला जाणारच असं पाक क्रिकेट बोर्डाने (PCB) स्पष्ट केलं. मोहम्मद रिझवान याच्याखेरीज इतर सर्व खेळाडू हे दुसऱ्या चॉइसचे खेळाडू आहेत. त्यामुळे दौऱा रद्द होणार नसल्याचं PCB चे अध्यक्ष वासीम खान यांनी सांगितलं.
 
आता हे सगळे खेळाडू आयसोलेशनमध्ये ठेवले आहेत. 25 जूनला पुन्हा या सर्वांची चाचणी होईल आणि त्यांच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या अंतिम संघाची घोषणा होईल, असं खान यांनी सांगितलं.
 
पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खान, वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि 19 वर्षीय फलंदाज हैदर अली यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं कालच स्पष्ट झालं होतं. त्यात 7 जणांची भर पडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धार्थ उद्याानातील वाघीणीचा मृत्यू, कोरोना अहवाल येणे बाकी