Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजस्थानमध्ये जगातील तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार होणार

राजस्थानमध्ये जगातील तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार होणार
नवी दिल्ली , बुधवार, 8 जुलै 2020 (13:05 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातले सर्वात मोठे क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले. या मैदानात 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही 80 हजार एवढी आहे. यानंतर जगातले तिसरे मोठे क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे. राजस्थान क्रिकेट  असोसिएशनने याबद्दलची घोषणा केली असून, या मैदानाची क्षमता 75 हजार एवढी असणार आहे.
 
या मैदानासाठी जयपूरजवळील चौम्प गावाजवळ जमीन निश्चित करण्यात आलेली असून, सुमारे 100 एकर जनिमीवर हे मैदान उभारले जाणार आहे. इनडोअर प्रक्टिस, कार पार्किंग यासह अनेक अत्याधुनिक सेवा या मैदानात दिल्या जाणार आहेत. हे मैदान तयार करण्यासाठी  350 कोटींचा खर्च अपेक्षित असून या मैदानाचे डिझाईन तयार झाल्याचे कळते. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हे मैदान दोन टप्प्यांमध्ये बनवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 45 हजार प्रेक्षकांना बसता येईल या पद्धतीने मैदान सुरु करण्यात येईल, यानंतर दुसर्याई टप्प्यात ही क्षमता 75 हजारापर्यंत वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्याते काम हे दोन वर्षांत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये जयपूर शहरात सध्या 30 हजार आसन क्षमता असलेले मैदान कार्यरत असून या मैदानावर आयपीएलचे सामनेही खेळवले गेले आहेत. मात्र गेल्या बर्या्च महिन्यांपासून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. त्यामुळे जगातले तिसरे मोठे क्रिकेट मैदान कधी तयार होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा ‘बॅक टू वर्क’