Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरसाठी प्रार्थना केली. म्हणाला, “मैदानावर माझा आवडता शत्रू लवकर बरा हो

shoaib akhtar
नवी दिल्ली , बुधवार, 31 मार्च 2021 (09:17 IST)
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या लवकर स्वास्थ्य मिळावे यासाठी प्रार्थना केली आहे. मास्टर ब्लास्टरच्या कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक झाल्यानंतर (Covid-19) अख्तरने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांच्यासाठी एक ट्विट केले आहे. सचिन तेंडुलकराने गेल्या आठवड्यात पुष्टी केली की कोविड -19 चाचणीत तो सकारात्मक आला आहे व त्याने स्वतःला घरीच क्वारंटीन केले आहे. कोविड -19च्या तपासणीत त्याच्या कुटुंबातील उर्वरित सदस्य नकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
सचिन तेंडुलकर अलीकडेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरींजमध्ये अॅक्शन करताना दिसला होता. ही मालिका छत्तीसगडमध्ये खेळली गेली. या स्पर्धेत सचिन हा भारतीय दिग्गजांचा कर्णधार होता आणि या मालिकेत भारताने विजय मिळविला. या मालिकेत सहभागी असलेले सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, युसुफ पठाण, एस. बद्रीनाथ आणि इरफान पठाणसुद्धा कोरोना विषाणूच्या तपासणीत सकारात्मक आढळले आहेत. या सर्व खेळाडूंनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची पुष्टी केली आहे. हे तिघेही रोड सेफ्टी मालिकेत सचिनच्या टीम इंडिया लीजेंडचा भाग होते.
 
सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजल्यानंतर शोएब अख्तरने एक ट्विट केले. सचिन तेंडुलरच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देणार्याए अख्तरने लिहिले- मैदानावरचा माझा आवडता शत्रू…. लवकर ठीक व्हा…

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ