Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी
, शुक्रवार, 26 एप्रिल 2024 (18:18 IST)
IPL 2024 मध्येही, ICC T20 World Cup ची तयारी सुरू आहे. T20 वर्ल्ड कप 2024 1 जूनपासून सुरू होत आहे, मात्र त्याआधी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगवर वर्ल्डकपसाठी नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ICC T20 विश्वचषक 2007 आणि ICC एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकला होता, दोन्ही विश्वचषकांची खास गोष्ट म्हणजे युवराज सिंगला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. आता 2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वीच युवराज सिंगबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
 
आयपीएल 2024 दरम्यान भारतीय चाहत्यांना आयसीसीने मोठी बातमी दिली आहे . आयसीसीने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. ICC T20 विश्वचषक 2007 मध्ये युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. याशिवाय युवीने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहे. या खेळाडूच्या निवृत्तीनंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी भारताला आजपर्यंत यापेक्षा चांगला पर्याय सापडलेला नाही. आयसीसीने युवराजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करून त्याचा गौरव केला आहे.

Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा निवडणूक 2024:भाजप नेते दिनेश शर्मा यांचे वक्तव्य, म्हणाले - मुंबईत भाजप विजयाचा षटकार ठोकणार