टीम इंडियात पुन्हा वाद, शर्माने विराटला केले अनफॉलो

गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (16:39 IST)
टीम इंडिया अंतर्गत पुन्हा एकदा वादाची ठिणगी आहे. टीममधले दोन धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्यात विस्तव जात असल्याचे बोलले जात आहे. रोहीत शर्माने विराट कोहलीला सोशल मीडीयावरून अनफॉलो केल्याचे समजतेय. ट्विटरवरून नेटकऱ्यांमध्ये देखील यावरून चर्चा सुरू झाली आहे.
 
रोहित आणि विराटचे ऑफ व ऑन फिल्ड कायमच एकमेकांसोबत चांगले संबंध होते. या दोघांना एकत्र खेळताना बघणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असायची. काही दिवसांपूर्वी इंग्लंडसोबत झालेल्या कसोटी सामन्याच्यावेळी रोहितने तो टिम इंडियासाठी ओपनिंग करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र तरिही त्याला सहाव्या क्रमांकावर बॅटींगसाठी पाठविण्यात आले. ती कसोटी भारत हरला त्यामुळे रोहित नाराज होता. त्यामुळेच त्याने कोहलीला अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

पुढील लेख गणेश भक्तांसाठी टोल फ्री प्रवास