अनेकदा अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. तर काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा खेळण्यासाठीही चुकीची माहिती दिली जाते. त्यामुळेच आता काही संघटनांनी पुढे येऊन कडक पाऊल उचलले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या बीसीसीआयने आता वय लपवणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. जर एखादा खेळाडू वय चोरीप्रकरणात अडकला तर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे. या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दोषी खेळाडूला बीसीसीआयच्या एकाही स्पर्धेत खेळता येणार नाही.