Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोहलीने दिग्गज डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविडला मागे टाकले

कोहलीने दिग्गज डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविडला मागे टाकले
हैदराबाद , शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (11:16 IST)
भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथे द्विशतक झळकावले आहे. हैदराबादमध्ये बांगलादेशविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने या नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही सलग चौथी मालिका आहे ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक केले आहे. याअगोदर सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे.
 
भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतक केली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक ठोकले आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने २२६ धावांची भागीदारी केली. विराट कोहलीच्या सोबतीने अजिंक्य रहाणेनेदेखील गोलंदाजांची धुलाई केली. रहाणेने आक्रमक खेळी करत करिअरमधील दहावे अर्धशतक पूर्ण केले. ८२ धावांवर अजिंक्य रहाणे बाद झाला.
 
भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली तेव्हा तीन विकेट्स गमावत ३५६ धावा होत्या. भारतीय फलंदाजांनी विशेष करुन विराट कोहलीने बांगलादेशी गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवत जोरदार बँटिंग केली. कोहलीने १११धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती. १७० चेंड्त कोहलीने १५० धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीने आपल्या गेल्या पाच कसोटी शतकांमध्ये नेहमी १५० हून जास्त धावा केल्या आहेत. त्याअगोदरच्या ११ शतकांमध्ये फक्त एकदाच तो १५० च्या पुढे जाऊ शकला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज सोमवार पासून मैदानात करणार जोरदार प्रचार