Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटने तोडला गावस्करचा रेकॉर्ड!

विराटने तोडला गावस्करचा रेकॉर्ड!
, मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (11:19 IST)
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 208 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल 19 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली. याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावे होता. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 18 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली होती. गावस्करांच्या नेतृत्वाखाली भारीतय संघाने 1977 ते 1979च्या दरम्यान हा रेकॉर्ड केला होता. विराटच्या नेतृत्वाखाली अपराजित राहण्याची ही परंपरा 20 ऑगस्ट 2015मध्ये कोलंबो टेस्टपासून सुरू झाली यानंतर आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. येत्या 23 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्याच कसोटी सामने रंगणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चारवर्षांची शिक्षा