ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. अहमदाबादमध्ये त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिनने भारतासाठी एकूण 100 शतके झळकावली होती. त्याचबरोबर विराटने आतापर्यंत 75 शतके ठोकली आहेत. यापैकी 28 शतके कसोटीत, 46 एकदिवसीय आणि एक टी-20 मध्ये आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे 16 वे शतक आहे. त्याने कसोटी आणि वनडेमध्ये प्रत्येकी आठ शतके झळकावली आहेत.या शतकासाठी त्याने 241 चेंडूंचा सामना केला.
कोणत्याही एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत सचिन अव्वल आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 शतके झळकावली. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर डॉन ब्रॅडमन आहे, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके झळकावली आहेत.