rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

Virat Kohli on terrorist hitlist
नवी दिल्ली , मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (13:02 IST)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच NIA च्या हाती यासंदर्भातली काही कागदपत्रे लागली आहेत. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
 
या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत सर्वात शेवटी विराट कोहलीचेही नाव आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या यादीत विराट कोहलीचे नाव कोणत्या कारणामुळे आले याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाही. केरळ मधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या High Power Committee ने देशभरातील या महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलम 370 : युरोपियन खासदारांच्या काश्मीर दौऱ्याला विरोधकांचा आक्षेप