Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पृथ्वी शॉबरोबर बाचाबाची करणारी सपना गिल नेमकी आहे तरी कोण, समोर आली माहिती...

Sapna
, शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (15:54 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ याची अलीकडेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्स सपना गिल आणि तिच्या काही मित्रांसोबत भांडण झाले. यानंतर पृथ्वी शॉने सपना विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सपनाला अटकही केली.
 
आता हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे आणि आता या प्रकरणी पृथ्वी शॉ स्वत:च आणखी अडचणीत येऊ शकतो असे बोलले जात आहे.
 
सपना गिलच्या वकिलाने दावा केला आहे की त्यांच्याकडे असा एक व्हिडिओ आहे, ज्यामुळे पृथ्वी शॉची असभ्य वर्तणूक सर्वांसमोर येईल. वकिलाने दावा केला आहे की, हा व्हिडीओ सपनाकडे असून ती लवकरच तो व्हिडीओ कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे आता पृथ्वी शॉबरोबर बाचाबाची करणारी सपना गिल नेमकी आहे तरी कोण, समोर आली माहिती...त्या बद्दल हा रिपोर्ट .....................
 
नेमकं काय घडलं?
सांताक्रुझच्या फाईव्ह स्टार हॉटेलात हे संपूर्ण प्रकरण घडलं. पृथ्वी त्याच्या मित्रासोबत डिनरला गेला होता. त्यावेळी दोन लोकांनी पृथ्वीसोबत सेल्फी काढला. त्यानंतर ते लोक परत आले आणि काही आरोपींसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह त्यांनी धरला. पण पृथ्वीने त्याला नकार दिला. मित्रांसोबत मी जेवण करण्यासाठी आलोय. मला त्रास देऊ नका, असं पृथ्वीने सांगितलं. त्यामुळे दोन्हीकडून शाब्दिक चकमक उडाली अन् त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर पृथ्वीच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलीस ठाण्यात सपनासह आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
सपना गिल ही मूळची पंजाबची
सपना गिल ही मूळची पंजाबची आहे. पंजाबमधील चंदिगडमध्ये ती राहात होती. सपना ही व्यवसायाने मॉडेल, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. सपनाचे इन्स्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सपना ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डान्सचे व्हिडिओ शेअर करते. ती मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप स्नॅपचॅट, व्हिडिओ शेअरिंग अॅप ‘जोश’वर देखील आहे. यावर सपना तिचे स्वतःचे व्हिडिओ देखील शेअर करते. आतापर्यंत ही माहिती काही जणांना माहिती होती. पण सपना फक्त एवढ्या गोष्टींपुरताच काही जणांना माहिती होती. पण सपनाची अजब माहिती आता समोर आली आहे.
 
भोजपुरी फिल्म करिअरची सुरुवात
सपनाने भोजपुरी सिनेमातही काम केले आहे, अशी माहिती आता समोर आली आहे. सपनानं भोजपुरी चित्रपटांतील सुपरस्टार रवी किशन, दिनेश लाल यादव आणि आम्रपाली दुबे यांच्यासोबतही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सपनाने तिच्या भोजपुरी फिल्म करिअरची सुरुवात ‘काशी अमरनाथ’ चित्रपटामधून केली होती. सपनाने ‘निरहुआ चलल लंडन’ या चित्रपटातही काम केलंय. सपनाचा २०२१मध्ये ‘मेरा वतन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून मात्र सपना जास्त प्रकाशझोतात नव्हती. पण ती आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत होती. पण आता पृथ्वी शॉबरोबर केलेल्या बाचाबाचीनंतर ती पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

९० वर्षीय आजीच्या डोळ्यातून निघाला १५ सेमी लांब जिवंत जंत