Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नी लियोनेलची फॅन, पण आमचा मेस्सी धोनीच : रैना

पत्नी लियोनेलची फॅन, पण आमचा मेस्सी धोनीच : रैना
मुंबई , मंगळवार, 12 मे 2020 (15:41 IST)
माझ्या पत्नीला फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, माझ्यासाठी आणि सीएसकेसाठी एमएस धोनीच मेस्सी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाज सुरेश रैना याने दिली आहे.

कोरोना व्हायरसच प्रकोपामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक देशांत  लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाला आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आपल्या घरी वेळ घालवीत आहेत. अनेक खेळाडू लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल कॅम्पेन्समध्ये सहभागी होत आहेत. अनेक खेळाडू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात.

रैनाही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. तो नेहमी आपले अपडेट्‌स सोशल मीडियामार्फत आपल्या फॅर्मान्सपर्यंत पोहोचवत असतो. अशातच रैना काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स सोबत एका लाइव्ह इन्स्टाग्राम चॅटमध्ये सहभागी झाला होता. रैनाने सांगितले की, जेव्हा कधी माझी पत्नी एखादी मॅच पाहण्यासाठी येते, त्यावेळी ती मला विचारते की, माहीभाईने हेल्मेट विकेटच्या मागे का ठेवलं आहे? तसेच आपण एकाच साइडवर क्रिकेट खेळू शकत नाही का? आपण सारखी साइड का बदलत असतो? यावेळी बोलताना रैना म्हणाला की, माझी पत्नी फुटबॉलची खूप मोठी फॅन आहे आणि तिला दिग्गज फुटबॉलर मेस्सी प्रचंड आवडतो. परंतु, आमच्यासाठी धोनीच  आमचा मेस्सी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनमोहन सिंग यांना आलेल्या 'त्या' फोनमुळे भारताचं भविष्य असं बदललं