Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Women's IPL: महिला आयपीएलला बीसीसीआयच्या एजीएमच्या बैठकीत मान्यता, पहिला हंगाम मार्च 2023 मध्ये

mahila cricket
, बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (10:52 IST)
बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत महिला आयपीएलला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या लीगचा पहिला हंगाम मार्च 2023 मध्ये होणार आहे. त्याची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईत झालेल्या एजीएमच्या 91व्या बैठकीत महिला आयपीएलसह अनेक प्रमुख निर्णयांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली. "महिला इंडियन प्रीमियर लीग आयोजित करण्यास बोर्डाने होकार दिला आहे,
 
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बोर्डाच्या 36 व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सौरव गांगुलीची जागा घेतली आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत पाच संघ असतील आणि ते मार्च 2023 मध्ये पुरुषांच्या आयपीएलच्या आधी खेळले जातील. या स्पर्धेत 20 लीग सामने असतील, ज्यामध्ये संघ दोनदा एकमेकांशी खेळतील. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघांना एलिमिनेटरचा सामना करावा लागेल. प्रत्येक संघाच्या प्लेइंग 11 मध्ये जास्तीत जास्त पाच परदेशी खेळाडू खेळू शकतात. 
 
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA U-17 Women's World Cup: ब्राझीलने भारताचा 5-0 ने पराभव केला, टीम इंडियाला स्पर्धेत एकही विजय मिळाला नाही