Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

९ एप्रिल ला कुरारगावात आदिवासी मेळावा​

aadwasi mela on 9th april
मुंबई , शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (21:09 IST)
आदिवासी समाजाचा विकास व्हावा आणि आदिवासी कुळसाया, रुढी परंपरा, अस्मिता जपली जावीत म्हणून आदिवासी स्वराज्य सेनेतर्फे येत्या रविवारी ९ एप्रिल ला मालाड पूर्व च्या कुरारगावात वामनराव पै सभागृह (कोकणी पाडा) येथे आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
 
ह्या आदिवासी मेळाव्यात सायंकाळी ४ ते रात्रीं १० वाजेपर्यंत आदिवासी कलासंस्कृती वर आधारित कार्यक्रम सादर होणार आहेत. आदिवासी लोकांचे विशेष तारपा नृत्य, आदिवासी समाजातील मान्यवरांची भाषणे पहावयास मिळणार आहे. कार्यक्रम ला उपस्थित राहणा-यांना भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. भोये, बोरसे, घुटे, पवार, भोंडवे, चौधरी, तरवारे, दळवी, बनसे, गवळी, गावित, सांबर, थोरात, भुसारे, पाडवी, जाधव, धोडिया, घरासिया ह्या आदिवासी परिवारांचा विशेष सहभाग ह्या मेळाव्यात लाभणार आहे.
webdunia
ह्या मेळाव्यात मा. आदिवासी मंत्री विष्णु सावरा, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ओबिसी सेल (कॉंग्रेस) चे मुंबई अध्यक्ष सुधीर भरडकर, सुनील कुमरे, मा. खासदार संजय निरुपम, मा. आमदार राजहंस सिंह, उत्तर मुंबई कॉंग्रेसचे सचिव संदीप सिंह, कुरार पोलिस निरीक्षक लिंबण्णा व्हनमाने, सहाय्यक आयुक्त पी.उत्तर (महानगरपालिका) संगीता हसनळे ह्या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती आयोजक दत्ताराम बिरारी यांनी दिली .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येथे बॅन आहे लहान बूब्‍स