Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सार्वजनिक शौचालयापेक्षा जास्त घाण असते ATM मशीन, होऊ शकतात गंभीर आजार

सार्वजनिक शौचालयापेक्षा जास्त घाण असते ATM मशीन, होऊ शकतात गंभीर आजार
वर्तमानात एटिएम मशीन ही प्रत्येकाची गरज आहे. दररोज लाखो लोक ATM मशीनीतून पैसे काढतात परंतू ATM वापरल्याने आरोग्यावर याचा प्रभाव पडू शकतो हे बहुतेकच लोकांना माहीत असेल. परंतू हे सत्य आहे. 
 
एका शोधाप्रमाणे एटिएम मशीनीवर गंभीर आजार पसरवणारे कीटाणु आढळतात. रिसर्चप्रमाणे फोन स्क्रीनवर देखील तेवढेच कीटाणु आढळतात जेवढे की टॉयलेट सीटवर. तेव्हा पासून लोक फोन वारण्यास सावधगिरी बाळगतात. 

अता नवीन शोधात हे आढळून आले आहे की ATM मशीनवर टॉयलेट सीटपेक्षा अधिक कीटाणु आढळतात. यामुळे आपण गंभीर आजारी पडू शकता. एटिएम मशीनच्या की-पॅड्सवर पब्लिक टॉयलेट सीट्ससारखे कीटाणु आढळतात.
 
ब्रिटनच्या शोध कर्त्यांनी एटिएम मशीन आणि पब्लिक टॉयलेटचे स्वॅब्स घेऊन त्यांची तुलना केली. दोन्हीमध्ये आढळणारे कीटाणु अतिसार सारखे धोकादायक आजार पसरवू शकतात असे सिद्ध झाले. हे परिणाम हैराण करणारे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विसरला नाही एक देखील आऊट