Boxing Day : बॉक्सिंग डे हा ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बॉक्सिंग डे प्रामुख्याने ब्रिटन आणि इतर राष्ट्रकुल देशांमध्ये साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे आणि त्याच्याशी संबंधित अनेक कथा आणि श्रद्धा आहे. तसेच बॉक्सिंग डे का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहास काय आहे. ते आज आपण जाणून घेऊ या.
एका मान्यतेनुसार, मध्ययुगात, चर्च लोक ख्रिसमसच्या दिवशी गरिबांसाठी देणगी गोळा करत असत. ही देणगी एका पेटीत ठेवली जायची आणि ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी गरिबांमध्ये वाटली जायची. म्हणूनच या दिवसाला नोकरांसाठी भेटवस्तू म्हणून ओळखले जाऊ लागले: तसेच दुसर्या मान्यतेनुसार श्रीमंत घरांमध्ये काम करणाऱ्या नोकरांना ख्रिसमसच्या दिवशी काम करावे लागले. त्यामुळे ख्रिसमसच्या आदल्या दिवशी त्यांना त्यांच्या मालकांनी भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तू एका बॉक्समध्ये देण्यात आल्या होत्या, त्यामुळे या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाऊ लागले.
तसेच काही देशांमध्ये बॉक्सिंग डे हा सेंट स्टीफन डे म्हणूनही साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मात सेंट स्टीफन यांना शहीद मानले जाते.
बॉक्सिंग डे कसा साजरा केला जातो?
बॉक्सिंग डे साजरा करण्याचे अनेक कारण आहे. काही देशांमध्ये हा दिवस कुटुंब आणि मित्रांसह एकत्र घालवला जातो. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात, पार्टी करतात आणि क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घेतात. काही लोक देणगी देऊन हा दिवस साजरा करतात.
बॉक्सिंग डे दिवशी काय केले जाते?
बॉक्सिंग डेला भेटवस्तू देणे ही एक सामान्य परंपरा आहे. लोक त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू देतात. तसेच बॉक्सिंग डेला अनेक लोक पार्टी आयोजित करतात. बॉक्सिंग डे हा क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घेण्यासाठी देखील ओळखला जातो. तर काही लोक हा दिवस दान करून साजरा करतात.बॉक्सिंग डे हा एक सण आहे जो आपल्याला इतरांबद्दल विचार करण्याची आणि त्यांना आनंदी करण्याची संधी देतो. बॉक्सिंग डे हा एक दिवस आहे जो आपल्याला एकमेकांच्या जवळ आणतो.