श्रावण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये योग, मौन, ध्यान, आराधना, साधना, जप, तप व शांती याद्वारे मनुष्य जन्मास मुक्ती मिळवणे. किंवा मानवजन्म काय आहे? मी तो कशासाठी व कसा जगाला, आनंद, उत्साह, मुक्त चिंतामुक्त, निर्भय व मस्त स्वस्थ जगण्याचे अनेक मार्ग आमच्या विविध योगशास्त्रात ग्रंथात कथन केले आहेत. पण केवळ योगासन करणे म्हणजे योग साधणे अशी समजूत अनेकांची असते. चार सत्संग ऐकून, पोथ्या पुराणे वाचून, दान पुण्य करुन पुण्यवान होण्याचा मार्गही क्षणिक आनंदाचा धनी होऊ शकतो. पण हे सारं जाणून घ्यायचं असेल, खरंच संपूर्ण मनःशांती हवी असेल तर लोकात काही काळ येणे टाळावे लागेल आणि एकांताचा अभ्यास साधावा लागेल.
आपण समाजशील प्राणी आहोत आणि कळपाने राहणे हा प्राण्यांचा स्वभाव असतो. हे जरी असलं तरी आपण संपूर्ण प्राणी नाही. मन, बुद्धी व विचार हे वेगळेपणाने लाभले आहेत आपणांस. तेव्हा आपण नक्की सुखी व्हायला पाहिजे. याचे मुख्य कारण आम्ही बहिर्मुखी जीवन जगत राहतो, लोकाभिमुख वृत्ती बनवतो. लोकांत फार प्रिय असतो. लोकसंग्रह केल्याने पद, पैसा, सत्ता, खुर्ची मिळू शकते. आत्मशांतीसाठी तर एकांत साधावा लागेल. मी कोण? आपलं ठेवलेलं नाव आज जे आपण वापरतो तीच आपली खरी ओळख मानतो. त्याच नावाला जपतो, त्याच्याच मोठेपणासाठी सारा अट्टाहास करीत राहतो. मी माझा मला कळण्यासाठी एकांतात जा, चिंतन करा, नी सापडेल.
निकलता था कारवाँ उनके हर पाँव के साथ
और गुंजता था नाम दसदिशाओंमें हरजहाँ
आज बन पडे है, है एक समाधी समशान में
पेड उग गये है ऊपर और नामोनिशाण मिट गये
ही आमच्या यशकीर्तीची दारुण अवस्था झाल्याचं पावलो पावली आम्ही पाहतो. हे सारं लोकांच्यात नाहीच कळणार, समजणार, जाणवणार, एकांतात जा कधी कधी. सोचके सोचो साथ क्या ले जाना है। आमची अनेक दुःखं कमी होतील, चिंतन करा चिंता नको. भयभीत होऊ नका. आजची कर्ज, उधार, उसनवार, लग्र, मुलंबाळं, नोकरी, बदली, व्यवसाय, प्रमोशन, घर, शेतीवाडी, पद प्रतिष्ठा हे सारं सारं आपणासाठी आहे. आपला जन्म केवळ इतकं मिळवण्यासाठी नाही. याचाही विचार एकांतात मनापासून करा. एकदम अगदी गंभीर होऊन नाही तर निवांतपणे करा. शांत राहा स्वस्थ राहा, आनंदी राहा. मनाचा वारु विवेकाच्या लगामांनी बांधा. सार्याच गोष्टी मनासारख्या घडतील असेच नाही. तशाच त्या मनाविरोधीही घडत नसतात. खरंच थोडा विचार करा.
आज एकांतात जाऊन. वास्तव जीवनाचा वास्तविक आनंद मिळेल. सारं सारं जपू या. मनुष्य जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू नक्कीच आहे. त्यासाठी एकांताची भीती वाटली तरी त्याची सवय ठेवावी लागेल कारण कितीही गोतावळा असला तरी आपण एकटेच जाणार आहोत म्हणून सार्यासकट जपा स्वतःला, कारण जगण्याच्या धावपळीत आपण जगणं हरवून बसलोय. निर्मळ आनंदी मुक्त मस्त जगायलाच मिळेना झालं आहे हल्ली. माझा जन्म केवळ बँकांचे हफ्ते फेडत मुलांबाळासाठी स्थावर, संपत्ती जमा करण्यासाठीच झाला का? याचाही विचार आज एकांतात जाऊन करावा. यामुळे बराचसा ताण नक्की कमी होईल. देणंघेणं फिटत राहील पण घेणं थोडं कमी करावं लागेल. अनेकांना अनेक प्रश्र्नांची उत्तरे एकांतात गवसतील वा गवसली व ती मुक्त झालीत, आपणही थोडा एकांत साधण्याचा प्रयत्न करु कारण कुणी कितीही सल्ले दिले तरी आपलं आपल्याला निस्तरावं लागतं ना? तेव्हा एकांतात निवांतपणा लाभतोच तो अत्यंत जाणीवपूर्वक मिळवावा हाच आहे आपला आजचा धडा. वाचा व विचार करा अगदी नी. चला तर मग लागा कामाला.