Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

JEE mains परिक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

JEE mains परिक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर
, बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (13:00 IST)
JEE mains परिक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंगळवारी परिक्षेच्या तारखा जाहीर केल्या. ही परिक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. त्यानुसार, पहिली परिक्षा ६ ते २० जानेवारी २०१९ आणि दुसरी परिक्षा ६ ते २० एप्रिल २०१९ दरम्यान होणार आहे.
 
पहिल्या परिक्षेच्या तारखा….
१) ऑनलाइन अर्ज : १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८
२) प्रवेश पत्र डाऊनलोड : १७ डिसेंबर २०१८
३) परिक्षेच्या तारखा : ६ जानेवारी ते २० जानेवारी २०१९
४) निकालाची तारीख : ३१ जानेवारी २०१९
 
दुसऱ्या परिक्षेच्या तारखा….
१) ऑनलाइन अर्ज : ८ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१९
२) प्रवेश पत्र डाऊनलोड : १८ मार्च २०१९
३) परिक्षेच्या तारखा : ६ एप्रिल ते २० एप्रिल २०१९
४) निकालाची तारीख : ३० एप्रिल २०१९
 
परिक्षेसाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना यांपैकी कोणतीही तारीख निवडता येणार आहे. त्याचबरोबर जर विद्यार्थी JEE Mains आणि NEET परिक्षेसाठी पात्र असेल तर संबंधित विद्यार्थ्यांचे दोन्ही परिक्षेतील गुण विचारात घेतले जाणार आहेत.
 
JEE Main 2019 : पात्रता निकष…
विद्यार्थ्याला १२वीच्या बोर्डाच्या परिक्षेत कमीत कमी ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक किंवा बोर्डाच्या टॉप २० टक्केवारीत असलेला विद्यार्थी JEE Mains किंवा अॅडव्हान्स परिक्षेसाठी पात्र असेल. यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती (SC, ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची मर्यादा ६५ टक्के आहे.
 
JEE Mains आणि अॅडव्हान्स परिक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आयआयटी, एनआयटी आणि आयआयआयटीज या शैक्षणिक संस्थांमध्ये बी. टेक, बी. ई. आणि बी. आर्क या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सात राज्यांच्या राज्यपालांमध्ये फेरबदल