Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजरात निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होतील

गुजरात निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होतील
नवी दिल्ली , बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:53 IST)
केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. निवडणूक आयोगाने गुजरातच्या निवडणुका हिमाचल प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रमासोबत जाहीर न केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.
 
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणांगणांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही ताकदीनं उतरल्यानं भाजपसाठी ही निवडणूक आणखीनच प्रतिष्ठेची बनली आहे.
 
तारखेवरुन वाद
यंदा गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक तारखांवरुन सातत्याने वाद सुरु आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी 12 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र त्यावेळी गुजरात निवडणुकीच्याही तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती झाली नाही.
 
हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला मतदान आहे. तर प्रचंड विरोधानंतर निवडणूक आयोगाने गुजरात निवडणूक 18 डिसेंबरपूर्वीच पार पडले असं सोमवारी जाहीर केलं होतं.
 
गुजरातचे रण का आहे महत्त्वाचे?
गुजरात निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे काँग्रेसने आव्हान दिलं आहे. त्याचमुळे नरेंद्र मोदी यांनी महिनाभरात तब्बल 5 वेळा गुजरात दौरा केला. गुजरात निवडणुकीला 2019 च्या लोकसभेची सेमीफायनल मानलं जात आहे. मोदी लाट आहे की नाही हे या निवडणुकीतून समोर येणार आहे.
 
दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निवडणुकीत जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी येण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तो मृतदेह बेपत्ता भारतीय मुलीचा आहे, अमेरिकी पोलिसांनी केली पुष्टी