हिरवीगार धरित्री, खळबळ नद्या वाहतात,
पर्वतराजी सभोवताली निष्ठेनं उभ्या दिसतात,
ऊन वारा पाऊस, समतोल राखितात,
ऋतू ही सारे आपले महत्व पटवितात,
एकमेकांना धरून च पर्यावरण चांगलं होतं,
हात मदतीचा द्यावा म्हणजे, देईल तो सोबत !
नानाविध औषधी वनस्पती जंगलात मिळते,
वन्य प्राण्यांनी सारे जंगल,सुशोभित होते,
रक्षण करण्या आम्ही सदैव सज्ज
असावं,
पर्यावरणाचा सांभाळ हेच ध्येय मनी जपावं!
...अश्विनी थत्ते