Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pateti :पतेती पारशी बांधवांचा सण

Pateti  :पतेती पारशी बांधवांचा सण
, मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (10:28 IST)
पतेती हा सण पारशी बांधव खूप उत्साहाने साजरा करतात.हा पारश्यांचा नववर्ष आहे.ज्या प्रकारे हिंदू,मुस्लिम बांधव आपले सण उत्साहाने साजरे करतात,त्याच प्रमाणे पतेती हा पारशी बांधवांचा सण आहे.हा पारश्यांचा नववर्ष दिवस आहे. या दिवशी पारशी बांधव अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात.
 
या दिवशी पारशी समाजातील लोक सकाळी लवकर उठतात.स्नानादि करून नवीन कपडे घालतात.सर्व लोक मिळून अग्यारीत प्रार्थना करण्यासाठी जातात.अग्यारी हे या समाजातील धर्मस्थळ आहे.अग्यारी त्यांना पूजनीय देवता आहे.या धर्मस्थळात सतत अग्नी प्रज्वलित करून ठेवतात.अग्यारीत धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करून आशीर्वाद देतात.नंतर सर्वजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
 
या दिवशी गरिबांना दान देण्याचे खूप महत्त्व आहे.गरजूंना अन्नदान ,मिठाई वाटप करतात.या दिवशी खास भोजन म्हणून सालीबोटी,मावा,निबोई,पत्र निमाच्ची आणि रवा फालुदा हे केले जाते. पारशी जेवण हे गुजराती आणि इराणी संस्कृतीचे मिश्रण आहे. पारशी लोक मांसाहारी असतात.भात आणि घट्ट वरणाचा पारशी खाद्यात समावेश असतो. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची सुटका, काय आहे हे प्रकरण?