Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्रीपदासाठी लाचार, वाघाची झालीय मांजर

मुख्यमंत्रीपदासाठी लाचार, वाघाची झालीय मांजर
, सोमवार, 4 मे 2020 (17:31 IST)
सध्या असल्यापरीस्थिती राजकारण करुन घेण्याची मोदींना कसलीही हौस नाही. एकूण परीस्थिती बघता भाजप अजून एक वर्ष तरी सत्तेत येत नाही. तरी सेनेची मुख्यमंत्री पद वाचावं म्हूणून केलेली धडपड सर्वांना माहीत आहेच. मा.मुख्यमंत्री उद्धजींनी राजकिय पेच मधून सुटण्यासाठी राज्यपालांसह मोदींना साकळ घातलं. अन त्याचा योग्य परिणाम होऊन निवडणूक आयोगाने विपच्या निवडणूक घेण्याच ठरवलंय. आता खरी कसरत ही आहे की भाजपने चौथा उमेदवार दिला तर निवडणूक घ्यावीच लागेल. भाजप काही करुन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल. कारण भाजपला असल्या परिस्थितीत राजकारण ही नकोय अन सत्ताही नकोय. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या मनात आलं तर ते कधीही महाराष्ट्रातील सत्ता घेवू शकतात. पण भाजप सध्या तरी तस करणार नाही. ह्या लेखात हेच सांगायचय की ह्या सार्या परीस्थितीत वाघाच कस मांजर झालय.?
webdunia
महाराष्ट्रात केंद्रालाच सत्ता नकोय कारण मागील पाच वर्ष सेनेने जो भाजपला त्रास दिलाय ज्या धमक्या दिल्या आहेत त्याचाच हा एकूण परीणाम आहे. सध्या भाजपला सत्तेपेक्षाही सेनेला जनतेच्या मनातून पुर्ण काढून टाकायचय. अन एक हाती सत्ता महाराष्ट्रात भाजपला हवी आहे. अन ते दिवसही काही दूर नाहीत. एका मुख्यमंत्री पदासाठी हिदूत्वालाही गहाण ठेवणारा नेता अन सेनेची ही लाचारी जनतेने चांगलीच ओळखलीय कारण सेना कधीही धोका देऊ शकते.सत्तेसाठी काही करु शकते. हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची परंपराच उद्धवजींनी धुळी मिळवलीय. बाळासाहेबांची हिंदू मनावर वेगळीच  छाप होती. सत्तेतही बाहेर राहून बाळासाहेबांना विचारल्या शिवाय मुख्यमंत्री सहीही करत नव्हता. मा.बाळासाहेबांना सत्तेत प्रत्यक्ष येण्याची गरजच नव्हती. एका इशार्यावर मुंबई थांबायची. अन तेच नेतृत्वाची कमी उध्दवजींजवळ नाही म्हणून की काय त्यांना प्रत्यक्ष सत्तेची गरज भासली .किंबवणा सेना नेतृत्वाला उद्धवजींशिवाय कुणीच दिसलं नाही. संजय राऊत जोकी महाभारतातील सेनेचा संजयच ज्याला दिव्य दृष्टी होती. त्यालाही ह्या पदाच लायक समजलं गेलं नाही.
 
राष्ट्रवादीचा यात दावही असू शकतो कारण त्यांना माहीत होतं सेना भाजप सत्तेवर आलेतर आपलं अस्तित्व नाहीसं होईल अन भविष्यात आपल्याला उमेदवारही मिळणही कठीण होईल. म्हणून सेनेचा बळी देऊन राज्य उपभोगायच मग सेनेचही काहीही नुकसान झालं तरी चालेल. अन ते होतच आहे कारण आता भाजप सेना सरकार असत तर परीस्थिती वेगळी असती. 288 जागांवर फक्त 2024 ला भाजप अन सेनाच असलं असती. पण राजकारणातील चाणाक्यरुपी पवारांनी नेमकी परीस्थितीचा आढावा घेतला अन भाजपसह सार्यांनाच हुलकाणी देत सत्ता स्थापन करुन घेतली. कारण पावसात भिजणार्या पैलवानाला राजकीय डावपेचही बरोबर माहीत होत. ह्या पवारांनी सेनेची पार मांजर करुन टाकलीय. कारण हे उद्धव सरकार स्थगिती सरकार म्हणून प्रसिध्द आहे. अन हिदूत्वालाही गहाण ठेवत मुख्यमंत्री पद मिळवलं जोकी सेनेचा मुख्य मुद्दा होता. पवारांनी बरोबर काट्यानेच काटा काढलाय. अन वाघाच पार मांजर केलय. जे मांजर आता फक्त दूधासाठी मँव करु शकतं पण दूधही कॉंग्रेसी माऊशी अन चाणाक्यच पाजतोय. वाघाचे नख ही कापले आहेत. वाघ आता डरकाळी फोडण्याच विसरला आहे. आता वाघाला अयोद्धेलाही जाण्यासाठी चाणाक्यरुपी पवारांची परवानगी लागते. आता वाघाच मांजर पवारांनी अन कॉंग्रेसी मावशीने केलं असलं तरी याचा फायदा जास्त भाजप अन राष्ट्रवादीलाच होणार हेच दिसत आहे आज निवडणूक झाली तरी भाजपलाच जास्त फायदा होणार हे कुठलाही राजकीय विश्लेषक सांगू शकतो.
- वीरेंद्र सोनवणे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना इफेक्ट: पाकिस्तानात पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त, भारतात का नाही?