Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीतीला मनातून घालविण्यासाठी काही टिप्स अवलंबवा

भीतीला मनातून घालविण्यासाठी काही टिप्स अवलंबवा
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (19:13 IST)
आजकाल आपल्या आजूबाजूला इतकी नकारात्मकता आहे की मनातून इच्छा असून देखील चांगले विचार येणं शक्य नाही. बरेच कमी लोक अशे असतात जे एकमेकांना प्रोत्साहन देतात.पुढे वाढण्याच्या शर्यतीत लोक एकमेकांना मागे सोडून पुढे वाढतात. सर्वीकडे चुकीचे वातावरण असल्यानं लोकांचा एकमेकांवरील विश्वास कमी होत चालला आहे. नकारात्मकता मनात घर करून बसल्यामुळे स्वतःवरील विश्वास देखील कमी होत आहे. या मुळे मनात भीतीने घर केले आहे. ही भीती आपल्या समोर कोणत्या न कोणत्या रूपानं समोर येते. भीतीचे काही प्रकार आहे. जसे की -
 * नापास होण्याची भीती.
* गर्दी समोर उभे राहण्याची भीती.
* उंचीची किंवा पाण्याची भीती.
* एखाद्याला गमाविण्याची भीती.
 
* नापास होण्याची भीती-
परीक्षेच्या वेळी चांगला अभ्यास न केल्यानं नापास होण्याची भीती असते, बऱ्याच वेळा आई-वडिलांच्या मुलांकडून खूप जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे देखील त्यांना नापास होण्याची भीती असते. 
* एखाद्याने कोणतीही गोष्ट अस्वीकार करण्याची भीती.
* लोकांच्या सामोरी जाण्याची भीती.
* अपमान होण्याची भीती असणे.
* ऑफिसात व्यवस्थित काम न केल्यानं बॉसची भीती असणे.
 
भीतीचे दुष्परिणाम -
* माणूस नैराश्यात जातो. 
* नकारात्मक विचारसरणीमुळे आत्मविश्वास हरपणे.
* बऱ्याच वेळा आत्महत्येचा विचार देखील येतो. 
* खोटं बोलणं सुरू होत.
* आयुष्यात प्रगती होत नाही. 
* भीतीमुळे आपले म्हणणे सांगू शकत नाही.
* भीतीमुळे आपली प्रतिभा लोकांपुढे आणता येत नाही.
 
भीतीला कमी करण्याचे उपाय 
 
-1  सकारात्मक विचारसरणी ठेवा-
 भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपण आपल्या मनात जुन्या गोष्टींवर विश्वास ठेवतो.आपल्या मनात नकारात्मक विचार भरून ठेवतो. असं करू नका सकारात्मक विचार ठेवा. चांगला विचार कराल तर सगळे चांगले होईल .आपल्या विचारात एवढे सामर्थ्य आहे की आपण जसे विचार करता तसेच होत.हे अट्रॅक्शनद्वारे केले जाऊ शकते. सकारात्मक विचारांनी भीती मनातून निघते.या शिवाय आपल्या विचारांवर ताबा ठेवा. बसल्या बसल्या काहीही विचार करू नका. बऱ्याच वेळा आपले विचारच आपले वैरी बनतात.  
 
* सकारात्मक राहण्याच्या पद्धती -
* नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहावं, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचा अनुभवांना समजा.
* सकारात्मक टीव्हीच्या मालिका बघा, पुस्तके वाचा,चांगलं वाचल्याने आणि बघितल्याने विचारसरणी तशीच होते. 
* अपयशी झाल्यावर निराश होऊ नका, सकारात्मक विचार करून पुढे वाढा.
 
2 जुन्या गोष्टी विसरून पुढे वाटचाल करा-  
आपले असे काही अनुभव असतात, ज्यांच्या मुळे आपल्याला पुढे वाढता येत नाही, त्यांना नेहमी जवळ बाळगतो.जे काही घडले आहे त्याला विसरून पुढे वाढा. असं आवश्यक नाही की ज्या गोष्टीने किंवा ज्या वाईट अनुभवाने आपल्याला त्रास झाला होता त्या गोष्टी ने आज देखील त्रास होईल असे काही आवश्यक नाही. जुन्या गोष्टींपासून धडा घेऊन पुढे वाटचाल करा.   
 
3 भीती वाटत असल्यास दीर्घ श्वास घ्या- 
भीतीला मनातून घालविण्याचा हा सोपा मार्ग आहे की दीर्घ श्वास घ्या.एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास 5 मिनिटे दीर्घ श्वास घ्या.असं केल्यानं शांती अनुभवाल.
 
4 भविष्याचा विचार करू नका- 
बऱ्याच वेळा आपण भविष्याला घेऊन भीती बाळगतो. उद्या आपले काय होणार, भविष्यात काय घडणार, नोकरी मिळेल की नाही, मिळाली असेल तर टिकेल की नाही. मुलांचे भविष्य कसे असणार अशा काही गोष्टींचा विचार करून आज खराब करतो.उद्याचा विचार करून काहीच साध्य होत नसते. उद्या काय घडणार हे कोणाला देखील ठाऊक नसते. उद्या ची काळजी करणे सोडून आजवर लक्ष द्या.
 
5 आत्मविश्वासी बना-
दुसऱ्यांवर विश्वास करणे चांगले आहे, परंतु आजच्या काळात कोणावर जास्त विश्वास ठेवू नये. सर्वप्रथम देवावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा की देव नेहमी आपल्या बरोबर आहे.स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्याला त्याची साथ नेहमी मिळते.नंतर स्वतःवर विश्वास ठेवा.नेहमी आत्मविश्वासी लोक जगात पुढे वाढतात.दुसऱ्यांवर अवलंबवून न राहता आपले काम स्वतः पूर्ण करा आणि  आपल्या स्वप्नांना पूर्ण करा.  
 
6 भीतीवर ताबा मिळवा- 
ज्या गोष्टींची भीती वाटते त्याची एक यादी तयार करा.ज्याची सर्वात जास्त भीती आहे असे काम शीर्षस्थानी ठेवा.हे काम कसे पूर्ण करावयाचे आहे त्याचा विचार करा.जसं जसं हे काम पूर्ण होईल आपल्या मनातली भीती देखील नाहीशी होईल. आपण आपल्या कमकुवतपणा आणि सामर्थ्याची देखील यादी तयार करा.आपला कमकुवतपणा आणि सामर्थ्य आपल्यापेक्षा कोणी अधिक चांगले समजू शकत नाही. बऱ्याच वेळा आपण ह्याचा विचार करत नाही. विचार केल्यावर या स्थितीमधून बाहेर पडणे 
सहज होईल.
 
7 ध्यान किंवा मेडिटेशन करा- 
मेडिटेशन किंवा ध्यान करणे चांगले आहे. दिवसातून 20 ते 30 मिनिटे शांतीने एकटे बसून देवावर विश्वास ठेवून त्याचे ध्यान करा.मेडिटेशन म्हणजे ध्यान करणे,आपल्या मनाच्या   आवाजाला ऐकणे. ज्या गोष्टीची भीती आपल्या मनात आहे ती गोष्ट ईश्वराला सांगा. स्वतःला त्याच्या चरणी अर्पण करा. असं केल्यानं आपल्या मनात एक नवी ऊर्जा संचारेल.मन शांत होईल आणि सकारात्मक विचार येतील.
 
8 भीतीला मनावर हावी होऊ देऊ नका- 
भीतीला आपल्या मनावर ताबा घेऊ देऊ नका.भीती अनेक रूपाने आपल्या पुढे येते. मनावर ताबा मिळविण्यासाठी भीती अजून त्रास देते. मनात भीतीचे वातावरण तेव्हाच निर्मित होते जेव्हा आपण भीतीला आपल्या मनात जागा देतो. ज्या क्षणाला आपल्या मनात एखाद्या गोष्टीची भीती असेल तर त्या गोष्टीच्या विपरीत विचार करा.असं केल्यानं आपण भीतीवर ताबा मिळवू शकता. 
 
9 ध्येय निर्धारित करा- 
आयुष्यात कोणतेही ध्येय नसेल तर माणूस भरकटतो. रिकामे डोकं नेहमी शैतानाचे घर असते. असं म्हणतात.आयुष्यात एखादे ध्येय असेल तर आपण त्याच्या प्राप्तीकडे लक्ष देत असतो आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो. ध्येय प्राप्तीच्या वाटचाली मधील मिळणारे लहान लहान यश देखील आत्मविश्वास वाढवतात. या मुळे आपल्या मनाची भीती कमी होते.  
 
10 भीती असावी-
नेहमी भीती वाईट असते असे नाही, आयुष्यात थोडी फार भीती असणे देखील महत्त्वाचे आहे.विचार करा की जर नापास होण्याची भीती नसेल तर विद्यार्थी अभ्यासच करणार नाही. आई वडिलांची भीती नसेल तर मुलं उनाड होतील.आजारी पडण्याची भीती नसेल तर लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही. ऑफिसमध्ये बॉसची भीती नसेल तर कर्मचारी काम चांगले करणार नाही. या साठी सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे आहे. आपण सकारात्मक राहाल तर आपल्या सभोवतालीचे वातावरण देखील सकारात्मक राहील. सगळे काही चांगले घडू लागेल. स्वतः सकारात्मक राहा आणि दुसऱ्यांना देखील सकारात्मक बनवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोहन डेलकर: दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर यांचा मृत्यू, आत्महत्येचा संशय